सलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय

धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत. 

Updated: Mar 3, 2015, 07:57 AM IST
सलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय

न्यूयॉर्क : धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत. 

२०१५ सालात फोर्ब्सची श्रीमंत व्यक्तींची यादी सोमवारी प्रसिद्ध झालीय. यामध्ये ९० भारतीयांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर (आंतरराष्ट्रीय स्तरावर ३९ वं स्थान) आहेत, त्यानंतर, औषध क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी (२० अरब डॉलर नेटवर्थसोबत ४४ व्या स्थानावर) तसंच अजीम प्रेमजी (१९.१ अरब डॉलरसोबत ४८ व्या स्थानावर) आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर, या यादीप्रमाणे ७९.२ अरब डॉलर्सच्या नेटवर्थसोबत बिल गेटस पहिल्या क्रमांकावर आहेत. गेल्या २१ वर्षांत तब्बल १६ वेळा बिल गेटस यांनी हे स्थान पटकावलंय. गेटस् यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे कालरेस स्लिम हेलू तर चर्चित अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे तिसऱ्या स्थानावर आहेत. 

फोर्ब्सनुसार, जगभरातील आर्थिक चढ-उतारांचा धनाढ्या कुबेरांच्या संपत्तीवर मात्र काहीच फरक पडला नाही. उलट त्यांच्या संपत्तीत भरच पडलीय. एकूण मिळून १,८२६ अरबपतींकडे जवळपास ७०५० अरब डॉलरचं नेटवर्थ आहे, जे एका वर्षापूर्वी ६४०० अरब डॉलर होतं. 

या यादीत ज्या भारतीयांना स्थान मिळालंय त्यामध्ये शिव नादर (६६ वे - १४.८ अरब डॉलर), हिंदुजा ब्रदर्स (६९ वे - १४.४ अरब डॉलर) लक्ष्मी मित्तल (८२ वे - १३.५ अरब डॉलर्स) कुमार मंगल बिर्ला (१४२ वे - ९ अरब डॉलर), उदय कोटक (१८५ वे - ७.२ अरब डॉलर) गौतम अदाणी (२०८ वे - ६.६ अरब डॉलर) सुनील मित्तल (२०८ वे - ६.६ अरब डॉलर्स) तसंच सायरस पूनावाला (२०८ वे - ६.६ अरब डॉलर) यांचा समावेश आहे. 

सर्वात श्रीमंत भारतीय असलेल्या मुकेश अंबानी यांचे बंधु अनिल अंबानी ४ अरब डॉलर्सच्या संपत्तीसोबत ४१८ व्या स्थानावर आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.