उत्तर मेक्सिकोत ३१ ठार

उत्तर मेक्सिकोमधील तामाउलीपस येथील कारागृहात विल्डिंग निव्हज आणि होममेज वेपन्स या दोन गटांमधील कैद्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात ३१ जण ठार झालेत.

Updated: Jan 5, 2012, 01:18 PM IST

www.24taas.com , रिओ ब्राव्हो 

 

उत्तर मेक्सिकोमधील तामाउलीपस येथील कारागृहात विल्डिंग निव्हज आणि होममेज वेपन्स या दोन गटांमधील कैद्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात ३१ जण ठार झालेत.

 

उत्तर मेक्सिकोमधील  सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामाउलीपस येथील कारागृहात विल्डिंग निव्हज आणि होममेज वेपन्स या दोन गटांमधील कैद्यांमध्ये  हाणामारी झाली. या दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांनी काही तासांनंतर यश आले. या हाणामारीमध्ये ३१ कैद्यांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी आहेत. जखमी कैद्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

अमेरिका-मेक्सिको सीमेवर ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या या दोन्ही टोळ्या आहेत. ड्रग्ज वाटपाच्या ठिकाणावरून या दोन्ही गटांमध्ये वाद झाला.  हा वाद विकोपाला गेला होता. मेक्सिकोमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कारागृहात झालेल्या हाणामारीत २० कैदी ठार झाले होते. मेक्सिकोचे अध्यक्ष फिलिपे कालडेरॉन यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत ड्रग्ज सुमारे ४६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.