पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

आज पाकिस्तानने ६० किलोमीटर एवढी विध्वंसक क्षमता असणाऱ्या अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केली. कमी अंतरावरच्या धोक्यासाठी आपली प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी हत्फ ९ या क्षेपणास्त्राची चाचणी केली.

Updated: May 29, 2012, 10:36 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

आज पाकिस्तानने ६० किलोमीटर एवढी विध्वंसक क्षमता असणाऱ्या अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केली. कमी अंतरावरच्या धोक्यासाठी आपली प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी हत्फ ९ या क्षेपणास्त्राची चाचणी केली.

हत्फ ९च्या आज झालेल्या चाचणीला लेफ्टनंट जनरल खालिद किडवाई उपस्थित होते. या क्षेपणास्त्राला शांतीचं शस्त्र म्हणत किडवाई म्हणाले की या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानची संरक्षणक्षमता अधिक मजबूत झाली आहे. यामुळे पाकिस्तानात शांतता नांदेल.

हे प्रक्षेपणास्त्र निर्माण करून भारताच्या रणनितीला उत्तर देण्याची तयारी केल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. अशा प्रक्षेपणास्त्रामुळे भारताविरुद्ध लढण्याची आपली क्षमता पाकिस्तानने वाढवली आहे. या प्रक्षेपणास्त्राचा वापर केवळ उत्तर देण्यासाठी होईल, असं म्हणणं असलं, तरी ही चाचणी नेमकी कुठे केली गेली, याबद्दल पाकिस्तानने मौन बाळगलं आहे.