भारतीय विद्य़ार्थ्याची अमेरिकेत हत्या

अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठात एमबीए करणा-या एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा विद्यार्थी भुवनेश्वर येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated: Apr 21, 2012, 04:05 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क

 

 

अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठात एमबीए करणा-या एका  २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा विद्यार्थी भुवनेश्वर येथील असल्याचे  स्पष्ट झाले आहे.

 

 

शेषाद्री राव हा बोस्टन विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाला होता.   त्याच्या पायावर आणि डोक्‍यात गोळ्या घातल्या होत्या. त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. शेषाद्रीच्या हत्येची बातमी ऐकून त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय.

 

 

बोस्टन विद्यापीठाच्या कॅम्पसपासून थोड्याच अंतरावर असलेल्या ऑलस्ट्रॉन स्ट्रीटवर एक तरूण जखमी अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना १९ एप्रिलच्या पहाटे मिळाली. ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बोस्टन अग्शिमन विभागाचे जवान त्याच्यावर प्राथमिक उपचार करत होते. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं या तरुणाचा थोड्या वेळातच मृत्यू झाला.
माहितीच्या आधारे शोधाशोध केली असता, भुवनेश्वरमध्ये या विद्यार्थ्याचं घर सापडलं आणि के. सुधाकर राव यांनी आपल्या मुलाच्या, शेषाद्रीच्या हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला. न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाच्या अधिका-यांनी फोनवरून आपल्याला ही बातमी कळवल्याचं या खंबीर पित्यानं सांगितलं. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास मला दूतावासातून फोन आला आणि तिथल्या अधिका-यांनी काही कागदपत्रं वाचून दाखवली. ती शेषाद्रीचीच असल्याचं मी ओळखल्यानंतर त्यांनी आम्हाला अत्यंत दुर्दैवी बातमी दिली, असं त्यांनी स्पष्ट केलं.