'मरे'मुळेच मेला मायकल जॅक्सन!

डॉक्टर मरे याच्यावर मायकल जॅक्सनला प्रोपोफोल या बेशुद्धीच्या औषधाचं अतिप्रमाण दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. जॅक्सनच्या मृत्यूप्रकरणी लॉस एंजेलिस न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. तसंच मरे याचा जामीन फेटाळून त्याला अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 8, 2011, 07:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, लॉस अँजेलीस

प्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सन याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर उपचार करत असलेला  डॉक्टर कोनरैड मरे याला दोषी ठरवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस न्यायालयाने डॉक्टर मरे याला दोषी ठरवलं आहे.

मायकल जॅक्सन याचा मृत्यू औषधाच्या जास्त प्रमाणामुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर मरेला लवकरच शिक्षा सुनावली जाणार आहे.

डॉक्टर मरे याच्यावर मायकल जॅक्सनला प्रोपोफोल या बेशुद्धीच्या औषधाचं अतिप्रमाण  दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. जॅक्सनच्या मृत्यूप्रकरणी लॉस एंजेलिस न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. तसंच मरे याचा जामीन फेटाळून त्याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भातील पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार असून त्याच दिवशी डॉक्टरला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. मायकलच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला चार वर्षाची शिक्षा होऊ शकते.

मायकल जॅक्सनचा मृत्यू २५ जून २००९ रोजी बेशुद्धीचं औषध प्रोपोफोलचं अतिसेवन केल्यामुळे झाला होता.