'दंगली'त आमीर खान गंभीर जखमी!

अभिनेता आमिर खानला शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झालीय. 

Updated: Nov 16, 2015, 07:04 PM IST
'दंगली'त आमीर खान गंभीर जखमी! title=

मुंबई : अभिनेता आमिर खानला शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झालीय. 

सध्या आमिर 'दंगल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं लुधियानामध्ये शूटिंग सुरू आहे. यात आमिर पहिलवानाची भूमिका साकारतोय.

शूटिंग दरम्यान एक सीन करताना आमीरच्या खांद्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी आमिरला एक आठवड्याच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे आमिर लुधियानाहून मुंबईकडे रवाना झालाय.

मात्र, आमिरने चाहत्यांना काळजीचं काहीही कारण नसल्याचं सांगितलंय. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा नव्या उत्साहाने शूटिंग सुरू करू, असं आमिरने म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.