मुंबई : आमिर खानने ´PK´च्या प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. यासाठी फिल्म निर्माताही कोणतीही कसर सोडत नाही. १९ डिसेंबरला चित्रपटगृहात येणारी ‘PK´ बॉलीवूडमध्ये रिलीज होणारी आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठऱणार आहे. ‘PK’ देशभरात ५२०० आणि ओव्हरसीजमध्ये ८२० स्क्रिन्समध्ये रिलीज होणार आहे.
एका इंग्रजी दैनिकाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्म मेकर्सची प्रत्येक चित्रपटगृहात ‘PK´ रिलीज करण्याची इच्छा आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक राजू हिरानी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अनेक ठिकाणी अजून चर्चा सुरू आहे. पण मी सांगू शकतो की ´PK’ ही आतपर्यंतचा सर्वात मोठा रिलीज ठरणार आहे. ‘PK´ १९ डिसेंबरला रिलीज होणार आहे आणि या तारखेच्या आसपास कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नाही आहे.
२०१४ मध्ये बँग-बँग, किक, आणि हॅप्पी न्यू इअर हे चित्रपट मोठ्या प्रमाणात रिलीज झाले. बँग-बँग ५० देशांमधील ४५०० आणि किक ४५ देशांमध्ये ५००० स्क्रिन्समध्ये रिलीज झाली होती. या पूर्वी आमिर खानची ‘३ इडियट्स’ १७०० हजारांपेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाली होती. चेन्नई एक्स्प्रेस ३५०० आणि धूम-३ ४५०० स्क्रिन्सवर रिलीज झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.