ABCD 2 ने हलविले बॉक्स ऑफिस, केली रेकॉर्ड ओपनिंग

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट एबीसीड़ी-२ ने रिलीजच्या सलग तीन दिवस गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला आहे. भारतातील थिएटरमध्ये चित्रपटाने तीन दिवसात ४६.३५ कोटी रुपये कमावले आहे. 

Updated: Jun 22, 2015, 06:09 PM IST
ABCD 2 ने हलविले बॉक्स ऑफिस, केली रेकॉर्ड ओपनिंग title=

मुंबई : वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट एबीसीड़ी-२ ने रिलीजच्या सलग तीन दिवस गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला आहे. भारतातील थिएटरमध्ये चित्रपटाने तीन दिवसात ४६.३५ कोटी रुपये कमावले आहे. 

चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.३० कोटी, दुसऱ्या दिवशी १४.५४ कोटी, आणि रविवारी १७.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडला ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड या चित्रपटाने केला आहे. 

चित्रपटाने पहिल्या दिवशी अक्षय कुमारचा चित्रपट गब्बर इज बॅकपेक्षा अधिक कमाई केली आहे. गब्बर इज बॅकने दोन दिवसात २४.५५ कोटींची कमाई केली आहे. 

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांच्यानुसार रविवारीच्या अॅडव्हान्स बुकिंग पाहता. चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये ४५ कोटींचा आकडा पार करू शकतो असे ट्विट केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.