दारूसाठी अभिषेक बच्चनने नाकारली 10 कोटींची ऑफर

Updated: Nov 24, 2014, 10:00 PM IST
दारूसाठी अभिषेक बच्चनने नाकारली 10 कोटींची ऑफर title=

 

मुंबई : ‘हॅप्पी न्यू ईअर’मधील अभिषेक बच्चनची नंदू भिडे या दारुड्याची भूमिका लोकांना खूप आवडली, पण या भूमिकेमुळे अभिषेकला एका अल्कोहोल ब्रँडने प्रचारासाठी दहा कोटींची ऑफर दिली. एवढी रक्कम मिळाल्यानंतरही अभिषेक या जाहिरातीसाठी तयार झाला नाही. 
अल्कोहोल ब्रँडची जाहिरात करून समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्यात अभिषेकला मुळीच रस नाही. अभिषेकनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, ‘मला चुकीच्या माध्यमातून पैसा कमवायचा नाही. कोणत्याही ब्रँडचा प्रचार करण्यापूर्वी माझा त्यावर विश्वास असणं आवश्यक आहे.’

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.