सलमानसोबत कोर्टात शपथेवर खोटं बोलणारा अशोक सिंगही अडकला!

सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात खोटी साक्ष देणारा सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंगही अडकणार असल्याचं दिसतंय. 

Updated: May 6, 2015, 06:03 PM IST
सलमानसोबत कोर्टात शपथेवर खोटं बोलणारा अशोक सिंगही अडकला! title=

मुंबई : सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात खोटी साक्ष देणारा सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंगही अडकणार असल्याचं दिसतंय. 

सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अशोक सिंगवरही खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश देण्यात आलेत. अशोक सिंगच आज (बुधवारी) सलमानला मुंबई सत्र न्यायालयात घेऊन आला होता. 

मार्च महिन्यात सलमानवरचा खटला अंतिम टप्प्यात पोहचला असतानाच अशोक सिंगनं कोर्टात खोटी साक्ष दिली. २८ डिसेंबर २००२ रोजी अपघात झाला त्यावेळी, सलमान नाही तर आपणच लॅंन्ड क्रूझर गाडी चालवत होतो असं अशोक सिंगनं म्हटलं होतं. 

'मी गाडी चालवत होतो आणि टायर फुटल्यामुळे ब्रेक जाम झाले आणि कार फुटपाथवर चढली... गाडीखाली काही लोक आले होते... मी उजव्या बाजुनं दरवाजाबाहेर निघालो. सलमानही त्याच दरवाजातून बाहेर पडला कारण डाव्या बाजूचा दरवाजा बंद झाला होता... त्यामुळे लोकांना सलमान गाडी चालवत होता असं वाटलं' असं अशोक सिंगनं कोर्टासमोर शपथ घेऊन सांगितलं होतं.
 
तब्बल १३ वर्षांनी अचानक आपणच अपघात केल्याचा साक्षात्कार झालेला अशोक सिंह खोटं बोलतोय... अशोकनं पैसे घेऊन खोटी साक्ष नोंदवल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं.   
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.