कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.

Updated: Sep 24, 2016, 07:59 PM IST
कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला. 

मनसेच्या या भूमिकेबाबत अभिनेता रितेश देशमुखनं प्रतिक्रिया दिली आहे. विषय कोणताही असो, कलाकार हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात, असं रितेश म्हणाला आहे. कलाकारांना लक्ष्य करणं हे दुर्दैवी असल्याची खंत रितेशनं व्यक्त केली आहे. कलाकारांना लक्ष्य केल्यामुळे समस्या सुटणार असेल तर ठीक आहे, पण हा उपाय नसल्याचं वक्तव्य रितेशनं केलं आहे.