बॉलिवूड अभिनेत्रीला घराबाहेर काढलं ?

बॉलिवूड अभिनेत्री अलीसा खान हिला तिच्या कुटुंबियांनी घरातून काढून टाकल्याची चर्चा आहे. एक व्हिडियो इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे अलीसाला घरातून काढल्याची चर्चा आहे. 

Updated: Jul 11, 2016, 12:35 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीला घराबाहेर काढलं ? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अलीसा खान हिला तिच्या कुटुंबियांनी घरातून काढून टाकल्याची चर्चा आहे. एक व्हिडियो इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे अलीसाला घरातून काढल्याची चर्चा आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिच्या नातेवाईकांकडे राहत आहे. अलीसा ही गाजियाबादमधील नवाब घराण्यातून आहे. १८ मार्चला अलीसा तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचा एका पर्सनल व्हिडियो लीक करण्याची धमकी दिली होती. व्हिडियो व्हायरल न करण्यासाठी त्याने अलीसाकडून ५० लाखांची मागणी केली होती. 

अभिनेत्री अलीसा हिला व्हॉट्स अॅपवर हा धमकीचा मॅसेज पाठवला गेला होता. तिचा एक व्हिडियो व्हायरल केला गेला आहे. या प्रकरणात एसएमएस आणि कॉल डिटेल पोलिसांना देण्यात आली आहे. अलीसाने आतापर्यंत १२ हून अधिक व्हिडियो अल्बममध्ये काम केलं आहे.