मुंबई : पोलिसांनी गुरूवारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. एका अभिनेत्रीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारकोप उपनगरातली मुफद्दल घडियालीने चित्रपटात रोल देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीवर अनेक वेळा बलात्कार केला. या अभिनेत्रीला तो पहिल्यांदा गेल्या महिन्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटला होता. त्याने सांगितले की तो आपल्या चित्रपटासाठी एक अभिनेत्री शोधत आहे.
एका पोलिस अधिकाऱ्यांने सांगितले की, काही दिवसांनंतर त्या अभिनेत्रीला रोलसाठी सिलेक्ट केले आणि तीन लाख रुपये साइनिंग अमाउंट आणि चित्रपट साइन करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. अभिनेत्रीने करारावर सही केली. याच्या खुशीत घडियालीने तिला काही तरी प्यायला दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला माहिती पडले की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे.
पीडित अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा करार रद्द करून घडियाली याने पुन्हा भेटू नको असे सांगितले. त्यानंतर घडियालीने तिचा पाठलाग केला. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. काल पीडित तरुणीने याची तक्रार पोलिसांमध्ये केली आणि आज घडियाली याला अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.