इंदौर : महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय.
'अलोन' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी इंदौरमध्ये दाखल झालेल्या बिपाशानं मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलीय. 'अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यावर येऊनही अजून खूपच हॉट आणि सेक्सी आहेत.... ते कमालच आहेत... नव्या कलाकारांच्या पीढीनं त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून १० टक्के तरी वैशिष्ट्ये मिळवलीत तरी पुरे...' असं बिप्सनं म्हटंलय.
यावेळी, बिपाशानं आपली एक अपूर्ण इच्छाही व्यक्त केलीय. बिपाशाला एखाद्या अॅक्शन सिनेमात काम करण्याची प्रचंड इच्छा आहे... अशा एखाद्या सिनेमात आपल्याला लीड रोल करायचाय, असंही बिपाशानं म्हटलंय.
अॅक्शन फिल्म्समध्ये अभिनेत्रींना मुख्य भूमिका निभावण्याची संधी मिळायला हवी. आम्ही अभिनेत्री अॅक्शन फिल्मचा एक भाग तर असतो पण अशा सिनेमांत आमच्याकडे काही खास करण्यासारखं नसतं... अशी खंतही तिनं यावेळी व्यक्त केली.
बिपाशाचा आगामी 'अलोन' हा सिनेमा एक हॉरर सिनेमा आहे. यामध्ये करण सिंग ग्रोवर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसेल. हा सिनेमा १६ जानेवारीला प्रदर्शित होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.