भारत सोडल्यानंतर पहिल्यांदा तोंड उघडल फवाद खानने...

 पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर भारतीयांच्या रागामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडावा लागला. मनसे सह अनेकांनी पाक कलाकारांना देश सोडून जाण्यास लावले. या प्रकरणानंतर पाक अभिनेता फवाद खान शांत होता आता त्याने आपलं तोंड उघडले आहे. 

Updated: Oct 7, 2016, 11:54 PM IST
भारत सोडल्यानंतर पहिल्यांदा तोंड उघडल फवाद खानने... title=

नवी दिल्ली :  पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर भारतीयांच्या रागामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडावा लागला. मनसे सह अनेकांनी पाक कलाकारांना देश सोडून जाण्यास लावले. या प्रकरणानंतर पाक अभिनेता फवाद खान शांत होता आता त्याने आपलं तोंड उघडले आहे. 

फवादने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आहे. फेसबूकवर पोस्ट करताना फवाद म्हटला, मी जुलैपासून लाहौरमध्ये आहे, कारण माझी पत्नी आणि मी दुसऱ्या मुलाची वाट पाहत आहोत. जगभरातून मला माझ्या फॅन्स आणि मीडियाने खूप सारे प्रश्न विचारले.ज्यात गेल्या काही काळात झालेल्या दुःखद घटनेबद्दल विचारण्यात आले. 

फवाद पुढे लिहतो, दोन मुलांचा पिता होण्याच्या नात्याने मला असे जग निर्माण करायचे की जेथे आम्ही शांततेत राहू शकतो. फवादने त्या सगळ्या बातम्यांचे खंडन केले, ज्यात त्याने बॉलिवूडवर आरोप केले आहेत. 

फवाद म्हणाला की हे पहिल्यांदा आहे की या मुद्द्यावर मी बोलतो आहे. त्यानंतर ज्या गोष्टीशी मला जोडले जाते आहे. त्याचा माझा काही संबंध नाही. मी अशा गोष्टी करत नाही. फवादने भारत आणि पाकिस्तानातील सर्व नागरिकांचे धन्यवाद मानले, जे त्याला पाठिंबा देत आहेत.