एआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?

'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.

Updated: Feb 13, 2015, 11:08 AM IST
एआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?  title=

मुंबई : 'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.

नुकतंच, या कार्यक्रमाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना गिरगाव कोर्टानं अभिनेत्री आलिया भट्ट, चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अन्य १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीचं नाव मात्र नाही... आणि नेमका हाच धागा अभिनेत्री आलिया भट्ट हिचे वडील आणि सिनेनिर्माते महेश भट्ट यांनी पकडलाय.

'जर ४००० जण उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी होणं आणि त्यांच्यासोबत हसणं हा गुन्हा असेल तर इतरांची नावं या एफआयआरमध्ये का नाहीत? एका भाजप खासदाराची (शत्रुघ्न सिन्हा) मुलगी सोनाक्षी सिन्हा ही देखील या कार्यक्रमात उपस्थित होती, मग तिचं नाव या एफआयआरमध्ये का नाही?' असं म्हणत महेश भट्ट यांनी आपला क्रोध व्यक्त केलाय. एका वर्तमानपत्राशी ते बोलत होते. 

हे प्रकरण ओढून धरण्याचा काही घटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप महेश भट्ट यांनी केलाय.  
 
दरम्यान, वाद निर्माण झाल्यानंतर 'एआयबी रोस्ट' या कार्यक्रमाचे व्हिडिओ यू ट्यूबवरून हटवण्यात आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.