'वंशभेदा'च्या आरोपामुळे ऐश्वर्या राय-बच्चन वादात

एका ज्वेलरी ब्रांडच्या जाहिरातीमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच वादात अडकलीय. 

Updated: Apr 23, 2015, 05:17 PM IST
'वंशभेदा'च्या आरोपामुळे ऐश्वर्या राय-बच्चन वादात title=

नवी दिल्ली : एका ज्वेलरी ब्रांडच्या जाहिरातीमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच वादात अडकलीय. 

ऐश्वर्या ही 'कल्याण ज्वेलर्स'ची ब्रांड अॅम्बेसेडर आहे. याच ब्रांडच्या एका जाहिरातीत ऐश्वर्या एका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये विविध दाग दागिन्यांची सजून कोचावर स्टारईलमध्ये बसलेली दिसतेय... आणि ऐश्वर्याच्या मागे एक लहान मुलगा धत्री धरून उभा असलेला दिसतोय.

या जाहिरातीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय. यासंबंधीत त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्याला एक जाहीर पत्रंही लिहिलंय. या कार्यकर्त्यांमध्ये महिला आणि मुलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. फराह नक्वी, हर्ष मंदर तसंच राष्ट्रील बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष शांता सिन्हा यांचाही यात समावेश आहे. 

कल्याण ज्वेलर्सच्या ही जाहिरात 'वंशभेदी' असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सोबतच, आपल्या ब्रॅन्ड़च्या जाहिरातीसाठी 'बाल कामगार' या कुप्रथेला उत्तेजन दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


ऐश्वर्याचा मूळ फोटो

यानंतर, ऐश्वर्यानं मात्र या आरोपांचं आपल्या वतीनं खंडन करत आपला बाजू साफ करण्याचा प्रयत्न केलाय. हा फोटो जेव्हा घेण्यात आला त्यात केवळ ऐश्वर्याच दिसतेय. हे स्पष्ट करण्यासाठी ऐश्वर्यानं आपला मूळ फोटोही जाहीर केलाय. कंपनीनं आपल्यावतीनं या जाहिरातीत रचनात्मक बदल केलेत त्यामुळे त्याची जबाबदारी कंपनीची आहे... आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं ऐश्वर्याचं म्हणणं आहे.

यानंतर, धाबं दणाणलेल्या ज्वेलरी कंपनीनं आपली ही जाहीरात मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.