पाहा ऐश्वर्याने किती जांभळं खाल्ली

ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. खास करून तो कान्स फेस्टीवलमधील असेल तर जास्तच असते.

Updated: May 16, 2016, 12:44 PM IST
पाहा ऐश्वर्याने किती जांभळं खाल्ली title=

पॅरिस : ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. खास करून तो कान्स फेस्टीवलमधील असेल तर जास्तच असते.

ऐश्वर्याचा कान्समधला लूक टि्वटरवर चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी ऐश्वर्या माध्यमांसमोर आली तेव्हा तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते. 
 
नेहमीपेक्षा तिचा हा लूक एकदम वेगळा होता. मेकअपमध्येही ऐश्वर्याचे सौदर्य खुलून दिसते, मात्र यावेळी ऐश्वर्याची लिपस्टिकच जास्त उठून दिसत होती. 
 
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले. ऐश्वर्याच्या 'सरबजीत' या आगामी चित्रपटाचे कान्समध्ये स्क्रिनिंग झाले.