न्यू यॉर्क : युवा संगीतकार अजय-अतुल यांनी ‘2015 फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटी 100’ यादीत ८२ वं स्थान पटकावलं आहे. या संगीतकार जोडीसा जागतिक स्तरावरील अत्यंत मानाच्या ‘फोर्ब्स’ मासिकाच्या सेलिब्रेटी यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’च्या जर्मनीतील सादरकरणासाठी त्यांनी स्वरबद्ध केलेल्या थीम म्युझिकचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ‘माऊली-माऊली’चा डंका विजेतेपदाची माळ पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वाजल्याचंही म्हटलं आहे.
अजय अतुल यांनी जोगवा, नटरंग, लयभारी सारख्या अनेक चित्रपटात गाणी स्वरबद्ध केली आहेत. इतकंच नाही तर अग्निपथ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवलं. पीके, ब्रदर्स चित्रपटातील त्यांची गाणीही विशेष गाजली होती. त्यानंतर दोघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
‘सेलिब्रेटी 100’ यादीत पदार्पण करणाऱ्या १४ जणांची फोर्ब्सने वेगळी ओळख करुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भावांची फोर्ब्स मासिकाच्या ‘2015 फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटी 100’ या यादीत दखल घेतली गेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.