ऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी

बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 

Updated: Oct 12, 2016, 09:09 PM IST
ऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी title=

मुंबई : बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 

भारतात एकूण ५५०० स्क्रिन्स आहेत. जेथे नवीन सिनेमे प्रदर्शित केले जातात. यंदा दिवाळीत 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'शिवाय' हे दोन सिनेमे रिलीज होणार आहे. यामुळे जास्तीत जास्त सिनेमागृहांमध्ये सिनेमा रिलीज करण्यासाठी मोठी स्पर्धा रंगली आहे. पण यामध्ये अजय देवगनने बाजी मारली आहे. ३ हजार स्क्रिन्सवर शिवाय रिलीज होणार असून 'ऐ दिल है मुश्किल' ही अडीच हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

'शिवाय'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. अजय देवगनच्या करिअरमधला हा सर्वात मोठा सिनेमा आहे. अजय या सिनेमाला मोठं यश मिळावं म्हणून खूप प्रयत्न करतोय. सिनेमागृहाच्या मालकांनी देखील या सिनेमाला पसंती दिली आहे.

सिंगल स्क्रीन सिनेमागृहांमध्ये अजयचे सिनेमे चांगला व्यवसाय करतात. सिंगल स्क्रीनसाठी 'शिवाय'ला मोठी मागणी आहे. तर दुसरीकडे 'ऐ दिल है मुश्किल'चा फोकस मल्टीप्लेक्स असणार आहे. करण आणि अजय यांच्यात कधी जमलं नाही. अजय देवगन हे बोलून देखील दाखवलं आहे. 

'शिवाय'मधून अॅक्टिंगसह अजय देवगन डायरेक्‍शन आणि प्रोडक्‍शन देखील करतोय. अजयसाठी शिवाय हा सिनेमा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्या यशासाठी त्याने कंबर कसली आहे. प्रेक्षक आता शिवाय कसा प्रतिसाद देतात हे आगामी येणारा वेळच सांगणार आहे. पण जास्तीत जास्त सिनेमागृहांमध्ये सिनेमा रिलीज करण्याच्या स्पर्धेत मात्र अजयने बाजी मारली आहे.