'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षय कुमार?

झी मराठीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या'चे वातावरण बॉलीवूडमय झाल्यासारखे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ब़ॉलीवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती. 

Updated: Jul 11, 2016, 11:36 AM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षय कुमार? title=

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या'चे वातावरण बॉलीवूडमय झाल्यासारखे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ब़ॉलीवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती. 

त्याआधी शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन हे कलाकारही चला हवा येऊ द्याच्या सेटवर येऊन गेले होते. या बॉलीवूड स्टारनंतर आता बॉलीवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार येण्याची शक्यता आहे. 

अक्षय त्याचा रुस्तम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येणार असल्याचे बोलले जातेय. 

अक्षयचा रुस्तम येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केलेय.