मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारनं सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी ५० लाखांची मदत केलीय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अक्षयकुमारनं मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला.
आणखी वाचा - नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षयकुमारनं केलेल्या मदतीबद्दल त्याचं ट्विटरवरुन आभार मानलेत. अक्षयकुमारनं बळीराजासाठी आणि पाण्यासाठी वेळोवेळी सुरु ठेवलेला मदतीचा ओघ इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे असं ते म्हणालेत.
आणखी वाचा - सिंग इज ब्लिंग : कॉमेडी आणि अॅक्शनचा अक्षय तडका!
अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल ९० लाखांची मदत जाहीर केली आहे. यानुसार तो महिन्याला १५ लाख अशी सहा महिने मदत करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.