सिद्धार्थसोबत लिफ्टमध्ये एकटी अडकली तर काय करणार आलिया

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत जर लिफ्टमध्ये फसली तर तू काय करशील असा प्रश्न जेव्हा आलिया भट्टला विचारला गेला तेव्हा तिने काय उत्तर दिले पाहा.

Updated: Oct 29, 2016, 03:53 PM IST
सिद्धार्थसोबत लिफ्टमध्ये एकटी अडकली तर काय करणार आलिया title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत जर लिफ्टमध्ये फसली तर तू काय करशील असा प्रश्न जेव्हा आलिया भट्टला विचारला गेला तेव्हा तिने काय उत्तर दिले पाहा.

आलिया तिचे वडील महेश भट्ट यांच्यासोबत वॉग मॅगजीनमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नावर मनमोकळी उत्तर दिली. तेव्हा तिला विचारण्यात आलं की जर ती तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत लिफ्टमध्ये फसली तर काय करेल तर त्यावर तिने म्हटलं की मी जे नेहमी सिद सोबत करते तेच, गप्पा! 

होस्टने जेव्हा तिला एक फोटो दाखवत पुढचा प्रश्न विचारला की, ही तू आणि तुझा लव्हर आहे. यावर तिने लगेच प्रतिक्रिया देत म्हचलं की, 'लव्हर, नाही काय बोललात तुम्ही लव्हर'?

2012 मध्ये स्टूडेंट ऑफ द ईयर सिनेमानंतर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील रिलेशन समोर आलं होतं. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा दोघेही एकत्र दिसले होते. पण याबाबत त्यांनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्याही चर्चा होत्या. पण त्यावरही दोघांनी मौन पाळलं आहे.