मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याची पत्नी किरण राव आणि पहिली पत्नी रिना दत्त यांच्यासोबत एकत्र मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसला. हे तिघेही आपल्या मुलांसोबत या हॉटेलमध्ये आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांनी एकत्र हॉटेलमध्ये डिनरही केलं आणि त्यानतंर एकाच गाडीतून ते सर्व हॉटेलमधून घरी रवाना झाले. आमिरने सर्व कुटुंबासोबत केलेली ही पार्टी सुमारे दोन तास सुरु होती. सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने आणि सहजतेने वागत होते.
आमिरची पहिली पत्नी रिना खूप आनंदी दिसत होती तर त्यांची मुलेही मजामस्ती करीत होती. आमिरने १९८६मध्ये रिनासोबत लग्न केले होते. मात्र २००२मध्ये आमिर आणि रिना एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यानंतर २००५मध्ये आमिरने दिग्दर्शक किरण रावसोबत लग्न केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.