'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'

बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.

Updated: Jan 24, 2017, 04:59 PM IST
'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत' title=

मुंबई : बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे. अमर सिंग यांनी बच्चन कुटुंबियांविषयी गौप्यस्फोट केला आहे. अमिताभ आणि जया बच्चन एकत्र राहत नसल्याचा खळबळजनक आरोप अमरसिंग यांनी केला आहे.

समाजवादी पार्टीमध्ये यादव कुटुंबियांमध्ये सुरु असलेल्या वादाला अमर सिंग जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत. याबाबत विचारलं असता अमर सिंग यांनी बच्चन कुटुंबियांबाबत हे वक्तव्य केलं.

कोणत्याही घराण्यांमधल्या भांडणांबाबत नेहमी मला जबाबदार धरलं जातं. अंबानी वेगळे झाले तेव्हाही कारण नसताना माझंच नाव पुढे करण्यात आलं. बच्चन कुटुंबिय आणि माझ्याबद्दलही हेच म्हणण्यात आलं, पण अमिताभ बच्चन यांना भेटण्याआधीच जया बच्चन या वेगळ्या राहत होत्या. त्यांच्यामधला एक जण प्रतिक्षा आणि दुसरा जनक या बंगल्यामध्ये राहत होता, असं अमर सिंग म्हणाले.