मुंबई : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी केला गेला आहे. शेरावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीची मानेचं हाड मोडल्याने हे प्रकरण गंभीर बनलं आहे. शिवाय त्याच्यावर बंदूक ताणून त्याला धमकावल्याचा आरोप शेरावर करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांची एक टीम शेराला अटक करण्यासाठी रवाना झाली असल्याचं कळतंय. सलमान खान जेथे ही जातो त्याच्यासोबत त्याचा हा बॉडीगार्ड शेरा त्याच्यासोबत असतो.
शेरा हा सलमानसोबत एका मित्राप्रमाणे राहतो. मागील १७ वर्षांपासून तो सलमान खानसोबत आहे. सलमान शेराला कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानतो. शेरा आज सलमान खानमुळे एक प्रसिद्ध बॉडीगार्ड बनला आहे.