चालत्या ट्रेनमधून लटकणाऱ्या अनिल कपूरला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

अभिनेता अनिल कपूरला रेल्वेची स्टंटबाजी चांगलीच महाग पडणार आहे.  

Updated: Jul 16, 2016, 08:43 AM IST
चालत्या ट्रेनमधून लटकणाऱ्या अनिल कपूरला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस title=

मुंबई : अभिनेता अनिल कपूरच्या आगामी 'ट्वेंटीफोर' या मालिकेचं प्रमोशन त्याला चांगलच महागात पडलंय. अनिल कपूरनं धावत्या लोकलमध्ये, लटकतं स्टंटबाजी केली. अनिल कपूरला रेल्वेची स्टंटबाजी चांगलीच महाग पडणार आहे. अनिल कपूर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेत, ही नोटीस बजावली आहे.

अनिल कपूरची नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेचे प्रमोशन करताना लोकल रेल्वेवर चढून अनिल कपूरने स्टंटबाजी केल्याप्रकरणी पश्चिम रेल्वेने संबंधित प्रॉडक्शन हाऊसला नोटीस पाठवली आहे. अनिल कपूरने एका मालिकेसाठी लोकलवर चढून स्टंटबाजी केली. पश्चिम रेल्वेने अनिल कपूरपासून इतरांनी प्रभावित होऊ नये यासाठी नोटीस पाठवली आहे. सात दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याचेही रेल्वेने या प्रॉडक्शन हाऊसला सांगितले आहे. 

अनिल कपूरने चर्चगेट स्टेशनवरुन शुटिंगसाठी परवानगी मागितली होती. रेल्वेने अनिल कपूरला शुटिंगसाठी परवानगी दिली होती. मात्र परवानगी देताना रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये शुटिंग करण्यास मान्यता दिली होती. पण अनिल कपूरने फुटबोर्डवर चढून, लटकत स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेतला आहे.

प्रवासा दरम्यान त्याने दरवाजात बाहेर डोकावून आपल्या चाहत्यांना अभिवादनं केलं. त्याच्या या स्टंटबाजीमुळे रेल्वेच्या अटींचा भंग झाल्याचं निदर्शनास येताच  रेल्वे प्रशासनाने अनिल कपूरला  नोटीस बजावलंय. एका हिंदी वाहिनीवर अनिल कपूरच्या गाजलेल्या 24 या मालिकेचं दुसरं पर्व लवकरच सुरु होणार आहे.