शहीद ऊधम सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अॅनिमेटेड व्हीडिओ

ऊधम सिंग हे नाव भारतीय स्वातंत्राच्या इतिहासात अजरामर आहे. ऊधम सिंग यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त डान्स अॅंड म्युझिक बॅंड 'स्का वेंजर्स'यांनी एक व्हीडिओ बनवला आहे. 

Updated: Jul 31, 2015, 05:50 PM IST
शहीद ऊधम सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अॅनिमेटेड व्हीडिओ title=

पंजाब : ऊधम सिंग हे नाव भारतीय स्वातंत्राच्या इतिहासात अजरामर आहे. ऊधम सिंग यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त डान्स अॅंड म्युझिक बॅंड 'स्का वेंजर्स'यांनी एक व्हीडिओ बनवला आहे. 

चार मिनिटांच्या या व्हीडिओचे नाव 'फ्रॅंक ब्राझिल' असे आहे. शुक्रवारी या व्हीडिओचा प्रिमियर म्युझिक चॅनेल 'व्हिएच १' वर  करण्यात आला.  हा व्हिडिओ अॅनिमेटेड असून त्यात त्यांचा संपूर्ण जीवनपट दाखवला आहे.  
जालियनवाला बाग हत्याकांड होत असताना ऊधम सिंग त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या वेळी पंजाबचे गव्हर्नर मायकल ओड्वायर होते. 
या हत्याकांडात ओड्वायर यांचा हात असल्यामुळे ऊधम सिंग यांना ओड्वायरचा खातमा करायचा होता.
ऊधम यांनी पुस्तकाच्या आत बंदूक लपवून लंडनच्या कॉक्सटन हॉलमध्ये गेले, आणि ओड्वायर यांची गोळी घालून हत्या केली.
ऊधम सिंग हे त्यांचे खरे नाव नसून शेर सिंग असे होते. १९३३ साली पासपोर्ट बनवण्यासाठी त्यांनी ऊधम सिंग हे नाव घेतले होते.
ओड्वायर यांची हत्या केल्यामुळे लंडनमध्ये त्यांच्यावर खटला चालला. त्यांना फाशीची शिक्षा झाली. 
पंजाबच्या बाहेर फारचं कमी लोकांना ऊधम सिंग यांच्या कार्याबद्दल माहिती असेल म्हणूनच त्यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त हा व्हीडिओ खास प्रेक्षकांसाठी आणला आहे अशी माहिती डान्स अॅंड म्युझिक बॅंड 'स्का वेंजर्स' च्या निखिल वासूदेवन यांनी दिली.  
पाहा हा व्हीडिओ -
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.