अनुष्का शर्मानं पहिल्यांदा विराटसोबतच्या नात्याची दिली कबुली

 सध्याचं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. एकत्र फिरत असले तरी आतापर्यंत त्यांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर केलं नव्हतं. पण नुकतंच पहिल्यांदा अभिनेत्री अनुष्का शर्मानं आपण विराट कोहलीला डेट करत असल्याचं कबुल केलंय. 

Updated: Feb 17, 2015, 03:49 PM IST
अनुष्का शर्मानं पहिल्यांदा विराटसोबतच्या नात्याची दिली कबुली title=

मुंबई:  सध्याचं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. एकत्र फिरत असले तरी आतापर्यंत त्यांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर केलं नव्हतं. पण नुकतंच पहिल्यांदा अभिनेत्री अनुष्का शर्मानं आपण विराट कोहलीला डेट करत असल्याचं कबुल केलंय. 

एका इंटरव्ह्यूमध्ये अनुष्का म्हणाली, 'मी आतापर्यंत याबद्दल याकरता बोलत नव्हती कार, जर कोणी सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली तर आपण प्रश्नांवर प्रश्न विचारता. त्यामुळं एखाद्याच्या खाजगी आयुष्याचा आपण सन्मान करत नाही, हेच यावरून सिद्ध होतं.'

वर्ल्डकपमध्ये बिझी असलेला भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत आपल्या नात्याबद्दल बोलणं अनुष्कानं नेहमीच टाळत आलीय. अनुष्का पुढे म्हणाली, 'मला माहितीय काय करायचं आणि काय नाही? मी याबद्दल बोलत नाही कारण त्यामुळे माझ्या कामावर परिणाम होईल.'

सध्या अनुष्का बॉलिवूडच्या अनेक आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अनुष्का बॉम्बे वेलवेट, झोया अख्तरचा चित्रपट 'दिल धडकने दो' आणि 'एनएच १०' मध्ये दिसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.