२२ सप्टेंबरला संपणार विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या अफवा

 भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी ग्रीनपार्क स्टेडियम लकी ठरु शकते. 

Updated: Sep 19, 2016, 08:10 PM IST
२२ सप्टेंबरला संपणार विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या अफवा title=

मुंबई :  भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी ग्रीनपार्क स्टेडियम लकी ठरु शकते. 

गेल्या अनेक महिन्यांपासून विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअप-पॅचअपच्या चर्चा रंगल्यात. तसेच अनेक दिवसांपासून त्यांना एकत्रही पाहिलेले नाही.  

२२ सप्टेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी सुरु होईल. भारतीय टीमची ही ५००वी कसोटी असणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान विराटचे मनोबल उंचावण्यासाठी अनुष्का शर्मा उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.