नवी दिल्ली : पाकिस्तानी गायक आतिफ असलम याची भारतात होणारी एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आलीय.
आतिफची 15 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या गुडगावमध्ये ही कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. उरी हल्ल्यानंतरच या कॉन्सर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होते.
जिल्हा प्रशासनानंही या कॉन्सर्टचं आयोजन करणाऱ्या कंपनीला हा कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या भावनांचा विचार करता ही कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलंय.