आझाद मला पीके म्हणतो- आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या खूपच खूश आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘पीके’बद्दल त्याच्या कुटुंबातूनच एक खास प्रतिक्रिया आलीय. आमीरनं सांगितलं की, त्याचा मुलगा आझाद त्याला पीके म्हणतो आणि चित्रपटातील आमीरच्या डांसची नक्कलही करतो. 

Updated: Dec 14, 2014, 09:03 AM IST
आझाद मला पीके म्हणतो- आमीर खान title=

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या खूपच खूश आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘पीके’बद्दल त्याच्या कुटुंबातूनच एक खास प्रतिक्रिया आलीय. आमीरनं सांगितलं की, त्याचा मुलगा आझाद त्याला पीके म्हणतो आणि चित्रपटातील आमीरच्या डांसची नक्कलही करतो. 

आमीरचा चित्रपट ‘पीके’ १९ डिसेंबरला रिलीज होतो. ज्याची उत्सुकतेनं वाट पाहणारा आमीर (४९)नं ट्विटर वर लिहिलंय, “बस आणखी सात दिवस... एक चांगली बातमी आहे, माझ्या कुटुंबात चित्रपट आवडलाय. माझा लहान मुलगा आझाद, मुलगी इरा, किरण आणि अम्मीनं फिल्म पाहिली.”

आमिरनं शुक्रवारी ट्विट केलाय, “सर्वांचं म्हणणं आहे की, हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. मी खूप उत्सुक आहे. आझाद मला ‘पीके’म्हणतोय आणि माझ्या डांसची नक्कल पण करतोय.”

आझाद, आमिर आणि किरण यांचा मुलगा आहे. आमिरची पहिली पत्नी रीनाचा मुलगा जुनैद पीकेच्या स्क्रीनिंगला हजर नव्हता. आमिरनं ट्विटरवर लिहिलंय, “फक्त जुनैद तिथं नव्हता. तो लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि १९ डिसेंबरलाच फिल्म पाहू शकेल. मी सातव्या आसमानात आहे.”

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’चा निर्माता विधु विनोद चोप्रा आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूतचीही भूमिका आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.