मुंबई : 'बागीः अ रेबेल फॉर लव' एक लव ट्राय अँगल स्टोरी आहे. याचे चित्रिकरण खूप सुंदर आणि शानदार आहे. पण काहणी खूप ठिकठाक आहे.
अॅक्शनच्या दृष्टीने टायगरने आपली संपूर्ण प्रतिभा पणाला लावली आहे. टायगरच्या अभिनयात पहिल्या चित्रपटाच्या मानाने खूप सुधारणा झाली आहे.
हलक्या फुलक्या कॉमेडीसाठी गुत्थी झालेला सुनिल ग्रोवर आणि संजय मिश्राने चांगले काम केले आहे.
चित्रपटाचे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे. पण प्रमाणापेक्षा लांब खेचलेले वाटतात. चित्रपटात रोमांस चांगल्या पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे.
चित्रपटात खूप रागीट स्वभावाचा रॉनी (टायगर) स्वतःवर नियंत्रण मिळविण्यासाठी केरळच्या अकादमी पाठविण्यात येते. याठिकाणी त्याला त्याच्या स्वभावासारखी सिया (श्रद्धा) भेटते. लवकरच त्याची भेट प्रेमात रुपांतरीत होते. तर अकादमीतील दुसरा विद्यार्थी राघव (सुधीर) सियावर प्रेम करत असतो.
राघव सियाचे अपहरण करून तिला बँकॉक घेऊन जातो. या ठिकाणी त्याचा खूप मोठा व्यवसाय असतो. मग सुरू होते सियाला मिळविण्याची लढाई. रॉनी सियाच्या शोधासाठी थायलंडला जातो. त्याचा सामना राघवशी होतो. मग दोघांचा सुरू होतो संघर्ष...
तुम्हांला अॅक्शन चित्रपट पाहण्याची आवड आहे, तर हा चित्रपट तुम्ही पाहिलाच पाहिजे. पण काहणी खूप प्रभावी नाही. श्रद्धा कपूरने अॅक्शन आणि रोमान्सचा कॉम्बो पॅक दिला आहे.
डायरेक्टर: साबिर अली
स्टारकास्ट: श्रद्धा कपूर, टाइगर श्रॉफ, संजय मिश्रा, सुधीर बाबू, सुनील ग्रोवर
कालावधी : 2 तास 20 मिनिट
सर्टिफिकेट कॅटेगरी: यू/ए