'एक अलबेला'चा टायटल व्हिडिओ रिलीज

 'एक अलबेला' हा सिनेमा डान्सिंग स्टार भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे. 

Updated: Apr 29, 2016, 04:43 PM IST
'एक अलबेला'चा टायटल व्हिडिओ रिलीज  title=

मुंबई : 'एक अलबेला' हा सिनेमा डान्सिंग स्टार भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे.  'एक अलबेला'या चित्रपटाचा टायटल साँग रिलीज करण्यात आलंय.

अभिनेता मंगेश देसाई याने भगवान दादा यांची भूमिका साकारली आहे. विद्या बालनने प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारली आहे. 

विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केलंय.

एक झलक पाहा