'बाहुबली २'ची जगभरात छप्परफाड कमाई

एस एस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या सिनेमाचे वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघोवतेय.

Updated: May 1, 2017, 02:14 PM IST
'बाहुबली २'ची जगभरात छप्परफाड कमाई title=

मुंबई : एस एस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या सिनेमाचे वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघोवतेय.

पहिल्या वीकेंडमध्ये या सिनेमाने जगभरात साधारण ५४० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जातेय. तज्ञ रमेश बाला यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिलीये.

या सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये ४१५ कोटी कमावलेत. तर इतर देशांमध्ये १२५ कोटींची कमाई केलीये. त्यामुळे एकत्रितरित्या या सिनेमाने जगभरातून तब्बल ५४० कोटींचा गल्ला जमवलाय.

या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉलीवूडमधील खानांच्या वर्चस्वाला धक्का दिला. बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर नेहमीच खानांचे वर्चस्व राहिलेय. मात्र बाहुबली २ने या सर्वानांच जोरदार धक्का दिलाय.