नवी दिल्ली : बाहुबली २ ने कमाई आणि यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. यात चित्रपटात भल्लालदेवची भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबती याने मीडियामध्ये आलेल्या वृत्ताचे खंडन केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार बाहुबलीच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन याला ऑफर होती पण त्याने बिझी शेड्युलमुळे या भूमिकेला नकार दिला होता.
झूम टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार हृतिक मोहनजोदडो चित्रपट करत होता. त्यामुळे त्याने अमरेंद्र बाहुबलीची भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा रोल प्रभासला दिला.
राणा दग्गुबती याने या वृत्ताचे खंडन करत सांगितले की, बाहुबलीच्या रोलसाठी प्रभास पहिली आणि शेवटची पसंती होता. त्यानेच अमरेंद्र बाहुबलीची भूमिका केली आहे. राणाने ट्विट करून म्हटले की ही बातमी चुकीची आहे. बाहुबलीची स्क्रिप्ट लिहिली जात होती त्यावेळीच प्रभास बाहुबली चित्रपटाचा भाग बनला होता.