कटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा

बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.

Updated: Aug 8, 2016, 05:59 PM IST
कटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा title=

 मुंबई : बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.
 
 धर्मा प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा आणि बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. बाहुबलीच्या हिंदी डबचे हक्क धर्मा प्रॉडक्शनकडे राखीव आहेत. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता आणि करण जोहर यांनी  ट्विटरवरून ही माहिती दिली. 
 
 28 एप्रिल रोजी फिल्म रिलीज होईल आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचाही उलगडा त्याच दिवशी होईल अशी माहिती अपूर्व यांनी दिली आहे.या फिल्मच्या क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असून यात अर्ध्या तासाचे युद्धही दाखवण्यात येणार आहे. 
 
 अर्का मीडिया वर्क्सच्या बॅनरखाली या फिल्मची निर्मिती होणार असून राणा डग्गुबाती, प्रभाष, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भुमिकेत दिसतील. या फिल्मचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली आहेत.