मुंबई : बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या सिनेमांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. पण बाजीराव मस्तानी हा सिनेमा बहुतेक या स्पर्धेमध्ये सरस ठरतांना दिसत आहे.
संजय लीला भंसाळी यांना सिनेमाचे डिस्ट्रीब्यूटर इरोज इंटरनॅशनलची साथ मिळाली आहे. त्यामुळे बाजीराव मस्तानी हा बजरंगी भाईजान आणि दिलवाले या दोन्ही सिनेमांवर मात करत पुढे निघून जाणार आहे.
बाजीराव मस्तानी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ८५० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. या आधी हा रेकॉर्ड सलमान खानच्या बजरंगी भाईजानच्या नावावर होता. जो बॉलीवूडमधील सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय सिनेमा म्हणून प्रदर्शित झाला होता.
बाजीराव मस्तानीने मात्र इरोज इंटरनॅशनलसोबत हा सिनेमा प्रदर्शित करत बजरंगी भाईजानचा रेकॉर्ड तोडला आहे.