मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाने आता अजून एक विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय कलेक्शन्स मिळून या सिनेमाने एकूण ३५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
१८ डिसेंबरला किंग खान शाहरुखच्या 'दिलवाले' सोबतच हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्याच्या कलेक्शन्स विषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या.
भन्साळींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा सिनेमा त्यांना खरं तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन करायचा होता. पण, ते काही शक्य झाले नाही.
भारतीय बाजारात या सिनेमाने २६० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ९० कोटींची कमाई केली आहे. तर शाहरूखच्या दिलवालेने ३८० कोटी रुपये कमावलेत. ३५० कोटींचा गल्ला जमावणाऱ्यांच्या यादीत आत्तापर्यंत पीके, बजरंगी भाईजान, धूम-३, चेन्नई एक्सप्रेस, प्रेम रतन धन पायो, थ्री इडियट, हॅप्पी न्यू ईयर, किक आणि क्रिश-3 या चित्रपटांचा समावेश आहे.
या चित्रपटात रणवीर सिंगने बाजीराव पेशव्यांची तर दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राने अनुक्रमे मस्तानी आणि काशीबाईंची भूमिका केली आहे.