व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jul 23, 2014, 12:44 PM IST
व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

मुंबई: हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. टिझरमध्ये जितकी मारझोड दिसते त्यावरून चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असल्याचं दिसतंय. हृतिक रोशन खूप उडतांना आणि अॅक्शन करतांना दिसतोय. त्यासाठी त्यानं बॉडीही जबरदस्त बनवलीय. त्याचं दर्शनही टिझरमध्ये आपल्याला होईल. कतरिना कैफ आपल्या बोल्ड अंदाजात दिसेल, सोबतच ती स्टंटही करतांना दिसेल. 

हृतिकच्या आवाजातील काऊंटडाउनसोबत हे टिझर सुरू होतंय. टिझरमध्ये हृतिकची एंट्रीही आपल्याला आवडेल. तर पाहा मग 'बँग बँग'चं टिझर...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x