जयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!

पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.

Updated: Nov 6, 2014, 02:38 PM IST
जयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी! title=
फाईल फोटो

मुंबई : पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.

नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात जया बच्चन यांनी शाहरुखचा सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ बकवास सिनेमा असल्याचं म्हटलं होतं. हॅपी न्यू ईअर सध्या पाहिलेल्या सगळ्या सिनेमांमधली सर्वात मूर्ख सिनेमा आहे. महत्त्वाचं म्हणजे, याच सिनेमात जया यांच्या मुलानं म्हणजेच अभिषेकही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो. 

केवळ अभिषेकमुळेच आपण हा सिनेमा पाहिल्याचंही जया यांनी प्रांजळपणे कबुली दिली होती. आपली ही प्रतिक्रिया त्यांनी शाहरुखसमोरही उघडपणे व्यक्त केली होती. पण, हेच मत त्यांनी जेव्हा सार्वजनिकपणे मांडलं तेव्हा अमिताभ बच्चन यांना शाहरुखला एक एसएमएस पाठवावा लागला. 

या एसएमएसमध्ये त्यांनी आपल्या पत्नीतर्फे शाहरुखला माफी मागितलीय. जया यांचा हेतून शाहरुख किंवा त्याच्या सिनेमाचा अपमान करण्याचा नव्हता, असं त्यांनी म्हटलंय. 

सिनेक्षेत्राशी निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ आणि शाहरुख यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत तसंच हॅपी न्यू इअरमध्ये सर्वात जास्त कौतुक अभिषेकचं होतंय... यामुळेच बीग बीनं शाहरुखला हा मॅसेज पाठवलाय. 

इतकंच नव्हे तर, अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी शाहरुखची भेट घेण्यासाठी त्याचं घरही गाठलं होतं... पण, तिथं त्यांचं स्वागत शाहरुखच्या पत्नीनं गौरीनं केलं... शाहरुखनं तर त्यांची भेटही घेतली नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.