‘श्रद्धा-शाहीद’सोबत सलमानही म्हणाला ‘बिस्मिल’!

‘बिग बॉस सीझन-8’च्या पहिल्या रविवारची रात्र ही खूप स्पेशल ठरली. कारण, बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले होते श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर... आगामी 'हैदर' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आले होते.

Updated: Sep 29, 2014, 05:14 PM IST
‘श्रद्धा-शाहीद’सोबत सलमानही म्हणाला ‘बिस्मिल’! title=

मुंबई : ‘बिग बॉस सीझन-8’च्या पहिल्या रविवारची रात्र ही खूप स्पेशल ठरली. कारण, बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले होते श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर... आगामी 'हैदर' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आले होते.

तसंच कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या विमानातून बाहेर पडावं लागलेल्या सोनाली राऊत हिच्याशी सलमानने गप्पा मारून विमानांतील प्रवाशांबदलच्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

शाहिद आणि श्रद्धाने थोड वेळ विमानातील प्रवाशांबरोबर घालविला. सिक्रेट सोसायटीतील सदस्यांनी प्रवाशांना काही चॅलेंज दिले होते. सलमान खानसोबत श्रद्धा आणि शाहिद दोघांनी 'हैदर' या सिनेमातील 'बिस्मिल' गाण्यावर डान्सही केला.

बिग बॉसच्या सेटवरही श्रद्धानं आपल्या गाण्याची हौस पूर्ण करून घेतली. सिक्रेट सोसायटीतील सदस्या दीपशिखा नागपाल आणि आर. जे प्रीतम यांना लवकरच विमानांतील बाकीच्या प्रवाशांसोबत प्रवास करायचा असल्याचंही सलमाननं म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.