बाहुबली 'प्रभाष'चा आज वाढदिवस, तुम्हांला माहित आहे का १२ इंटरेस्टिंग गोष्टी

 बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'ने जबरदस्त यश मिळविले. त्या बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभाष आता घराघरा लोकप्रिय झाला आहे. तरही तुम्हांला त्याच्याबद्दल १२ इंटररेस्टिंग गोष्टी माहीत आहे का? 

Updated: Oct 23, 2015, 03:30 PM IST
बाहुबली 'प्रभाष'चा आज वाढदिवस, तुम्हांला माहित आहे का १२ इंटरेस्टिंग गोष्टी title=

मुंबई :  बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'ने जबरदस्त यश मिळविले. त्या बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभाष आता घराघरा लोकप्रिय झाला आहे. तरही तुम्हांला त्याच्याबद्दल १२ इंटररेस्टिंग गोष्टी माहीत आहे का? 

1) प्रभाषचे संपूर्ण नाव प्रभाष राजू उप्पलापाटी आहे. त्याचे जास्त काम तेलुगू सिनेमात आहे. 
२) प्रभाषची पहिला हिंदी चित्रपट प्रभुदेवाचा 'अॅक्शन जॅक्सन' आहे. त्याने एक छोटा रोल केला होता. 
३) बाहुबलीसाठी प्रभाषला १.५ कोटी रुपयांचे जीम इक्विपमेंट्स चित्रपटाच्या निर्मात्याने गिफ्ट दिले होते. प्रभाषला आकर्षक रुपात दिसण्यासाठी हे गिफ्ट दिले होते. त्याला वजन वाढायचे होते पण लठ्ठ दिसायचे नव्हते. 
४) प्रभाषची ट्रेनिंग लक्ष्मण रेड्डीने (२०१० च्या मिस्टर वर्ल्ड) घेतली होती. 
५) प्रभाष अरेंज मॅरेज करणार आहे. या डिसेंबरमध्ये त्याचे लग्न होणार आहे. परंतु बातम्यांनुसार बाहुबली पार्ट २ साठी त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. 
६) प्रभाषची होणारी पत्नी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी छोटी आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी आहे. 

७) बाहुबली चित्रपट सुरू असताना प्रभाषने कोणताच चित्रपट केला नाही. 
८) प्रभाषला राजकुमार हिरानी यांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स' त्याने २० वेळा पाहिले आहेत. 
९) प्रभाषचा आवडता अभिनेता रॉबर्ट डी निरो आहे. 
१०) बाहुबलीपूर्वी प्रभाष याने दिग्दर्शक राजमौली यांच्यासोबत 'छत्रपती' हा चित्रपट केला आहे. 
११) 'बाहुबली' रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शक राजामौली यांनी चित्रपटाच्या म्युझिक रिलिजवेळी म्हटले की प्रभाष शिवाय हा चित्रपट बनूच शकला नसता. 
१२) 'बाहुबली'साठी प्रभाषने एकूण ३०० दिवस शुटिंग केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.