मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्यात सध्या ठिक नाही असच दिसून येत आहे. मीडिया सूत्रांनुसार दोघांमध्ये दुरावा आल्याची वृत्त येत आहेत. सांगितले जात आहे की, अनुष्का आणि विराटमध्ये दुरावा आलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या रिलेशनशीपबद्दल कधीही जाहीरपणे न बोलणारी अनुष्कानं आपल्या नात्याला खूप सीरियसली घेतलंय. ती विराटसोबत लवकरच विवाहबंधनात अडकण्याची स्वप्न पाहतेय. पण, विराट कोहली... त्याला मात्र आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचंय... त्यामुळे तो थोडा चिल् आहे... आणि त्यामुळेच त्यानं आपलं विवाहाचा विचारही पुढे ढकललाय.
अधिक वाचा : बॉलिवूडमधील टॉपच्या दहा मानधन घेणाऱ्या या अभिनेत्री
यामुळेच अनुष्का त्याच्यावर चिडलीय. याचमुळे, विराटसोबत हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या लग्नातही न जाण्याचा निर्णय तिनं घेतलाय. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या नात्याला खूप गंभीरतेनं घेणाऱ्या अनुष्कानं काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये असताना लव्ह लॉक ब्रिजवर विराट आणि आपलं नावही लिहिलं होतं.
या दिवसात अनुष्का आपल्या आगामी सिनेमा, 'ऐ दिले है मुश्किल'च्या शुटिंगचे पहिले सत्र लंडनमध्ये पूर झालेय. करण जोहर यांच्या या सिनेमात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर दुसरीकडे विराट दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेत व्यस्त आहे. गुरुवारी त्याने चेन्नईत शानदार शतक करत सूऱ समवलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.