करीनानंतर ही आहे भोपाळची दुसरी सेलिब्रिटी 'सून'!

'नवाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये करीनानंतर   आता आणखीनं एक सेलिब्रिटी सून दाखल होणार आहे... ही सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून 'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग आहे...

Updated: Sep 23, 2015, 04:28 PM IST
करीनानंतर ही आहे भोपाळची दुसरी सेलिब्रिटी 'सून'! title=

भोपाळ : 'नवाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये करीनानंतर   आता आणखीनं एक सेलिब्रिटी सून दाखल होणार आहे... ही सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून 'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग आहे...

भोपाळच्या अंकित शर्मा याच्यासोबत बॉबी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. महत्त्वकांक्षी अंकितलाही बॉलिवूडमध्ये आपल्या करिअर आजमावयची इच्छा आहे.   

बॉबी डार्लिंगचं खरं नाव आहे पंकज शर्मा... बॉबीनं २३ वर्षांच्या वयापर्यंत १८ गे भूमिका केल्यात... हा त्याचा अनोखा रेकॉर्ड लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदविण्यात आलाय. बिग बॉसनंतर स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याला अनेक चाहतेही लाभले. 

बॉबी आणि अंकितची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली. त्यानंतर फेसबुकवरून एकमेकांशी संवाद साधता साधता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले... आणि मग एकदिवस अंकितनंच आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, असं बॉबीनं म्हटलंय. 
 
सध्या बॉबी आपल्या लग्नाच्या खरेदीकरता भोपाळमध्ये दाखल झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.