शाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं. 

Updated: Aug 12, 2016, 08:57 AM IST
शाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात title=

नवी दिल्ली : बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं. 

अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून ही कारवाई करण्यात आली. शाहरूखला याआधीही अनेकदा अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटनं रोखलंय. 

शाहरूखनं याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केलीये. अमेरिकन सुरक्षा यंत्राणाचा आदर करतो. पण प्रत्येक वेळी अशा प्रकारे रोखून धरणं अत्यंत मनःस्ताप देणारं असल्याचं शाहारूखनं म्हटलय.