ऋतिक ठरला 'सेक्सिएस्ट एशियन इन द वर्ल्ड '

बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा आशियाचा सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय. 

Updated: Dec 11, 2014, 08:04 AM IST
ऋतिक ठरला 'सेक्सिएस्ट एशियन इन द वर्ल्ड ' title=

लंडन : बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा आशियाचा सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय. 

'५० सेक्सिएस्ट एशियन मेन इन द वर्ल्ड'ची यादी प्रत्येक वर्षी ब्रिटनचं मासिक 'इस्टर्न आय'मध्ये प्रकाशित केली जाते. 

४० वर्षीय ऋतिक या यादीत पुन्हा एकदा एशियातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय. गेल्या वर्षी ऋतिकचं नाव मागे पडलं होतं. 

बुधवारी जाहीर केलेल्या रेटिंग्समध्ये टीव्ही अभिनेता कुशाल टंडन सगळ्यांना आश्चर्यचकित करत दुसऱ्या नंबरवर पोहचलाय. तर गेल्या वर्षीचा विजेता अभिनेता अली जफर तिसऱ्या नंबरवर पोहचलाय. 

टीव्ही अभिनेता विवियन डी'सेना पहिल्यांदाच या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये दाखल झालाय. 

यावर प्रतिक्रिया देताना ऋतिकनं 'इस्टर्न आय'चे आभार मानलेत. हा आकर्षक टॅग मिळवून मला आनंद झालाय. माझ्या मते सेक्सी असण्याचा अर्थ शारीरिक कमी पण मानसिकरित्या जास्त आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.