Year Ender 2015 : बॉलिवूडमधील टॉप पेड (मानधन) १० अभिनेते

 बॉलवूडमध्ये २०१५ या वर्षात मानधन स्वीकारणारे १० अभिनेत्यांची यादी आम्ही तुम्हांला देत आहेत.    

Updated: Dec 18, 2015, 04:55 PM IST
Year Ender 2015 : बॉलिवूडमधील टॉप पेड (मानधन) १० अभिनेते  title=

मुंबई :  बॉलवूडमध्ये २०१५ या वर्षात मानधन स्वीकारणारे १० अभिनेत्यांची यादी आम्ही तुम्हांला देत आहेत. 

१) सलमान खान - ६० कोटी 

सुपरस्टार सलमान खान हा बॉ़लिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका रिपोर्टनुसार सलमान खान प्रत्येक सिनेमासाठी ६० कोटी रुपये घेतो तसेच चित्रपटातील नफ्यातील हिस्सा घेतो. 

२) आमीर खान - ५० कोटी 
मिस्टर पर्फेक्शनिस्ट हा आपला चित्रपट निवडताना खूप काळजी घेतलो. तो दुसऱ्या क्रमांकाचा अभिनेता आहे जो सर्वाधिक मानधन घेतो. तो ५० कोटी रुपये मानधन स्वीकारतो. तसेच नफ्यातील हिस्साही स्वीकारतो. तो मानधनात काही कमी जास्त करतो पण नफ्यात तो कोणतीही तडजोड करत नाही. 

३) अक्षय कुमार - ४० ते ४५ कोटी 

तीन खानांव्यतिरिक्त बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून अक्षय कुमार याचे नाव पुढे येते. तो आपल्या चित्रपटासाठी तो ४०-४५ कोटी रुपये मानधन स्वीकारतो. तसेच नफ्यातील हिस्साही स्वीकारतो. तसेच तो बॉलीवूडमधील सर्वात जास्त टॅक्स भरणारा अभिनेताही आहे. 

४) शाहरूख खान - ४० कोटी 

बॉलिवूडचा किंग खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ३५ ते ४० कोटी रुपये मानधन घेतो. तसेच नफ्यातील हिस्साही स्वीकारतो. आता त्याचे बहुतांशी चित्रपट हे त्याचा होम प्रो़डक्शनचे असल्याने तो केवळ पगार घेतो. 

५) हृतिक रोशन - ४० कोटी 

भारतीय सुपर हिरो आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ४० कोटी रुपये मानधन घेतो. पण नुकत्याच आलेल्या एका माहितीनुसार त्याने अशुतोष गोवारीकर याच्या मोहनजोदोडो या चित्रपटासाठी ५० कोटींचे मानधन स्वीकारले. ही माहिती खरी असली तर तो दोन क्रमांक पुढे जाऊन तिसऱ्या स्थानावर येईल. 

६) रणबीर कपूर - ३० कोटी 

रणबीर कपूर हा दुसऱ्या फळीतील सुपरस्टार आहे. त्याचे अनेक चाहते आहे. त्यामुळे तो टॉप १० पेड बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये वर्णी लागते. तो ३० कोटी प्रत्येक चित्रपटासाठी स्वीकारतो. आता त्याचे चालणारे चित्रपट पाहता त्याची फी वाढण्याची शक्यता आहे. 

७) अजय देवगण - २५ कोटी 

रणबीरनंतर अजय देवगण याचा या यादीत सातवा क्रमांक लागतो. चित्रपटातील नफ्यासोबत तो २२ ते २५ कोटी रुपये प्रत्येक चित्रपटात स्वीकारतो. त्याचे बॉलीवूडमध्ये सध्या काही चित्रपट हीट झाले आहे. त्यामुळे त्याचे मानधनही वाढण्याची शक्यता आहे. 

८) अमिताभ बच्चन - २० कोटी 

सुपरस्टार अमिताभ बच्चन हे वृद्ध झाले पण त्यांनी टॉप १० मधील आपला क्रमांक सोडला नाही. प्रत्येक सिनेमासाठी ते १८ ते २० कोटी रुपये मानधन घेतात. 

९) सैफ अली खान - १५ कोटी 
नवाब सैफ अली खान या यादीत नवव्या स्थानावर आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी १५ कोटी रूपये स्वीकारतो. त्याचा प्रत्येक चित्रपट साधारण कामगिरी करतो. 

१०) रणवीर सिंह - १५ कोटी 
आपल्या पिढीतील सर्वात चांगला अभिनेता असलेल्या रणवीर सिंह याला नेहमी बातम्यांमध्ये राहला आवडते. त्या टॅलेंटेड अभिनेत्याला प्रत्येत १२ ते १५ कोटी मानधन मिळते.