पणजी: गोव्यात फुल्ल ऑन सेलिब्रेशन सुरू असलं तरी गोव्यातल्या सेलिब्रेशनला गालबोट लागलंय. गोव्यातल्या कांदोळी किनाऱ्यावर सुरु असलेल्या सुपर सॉनिक पार्टीमध्ये मुंबईची फॅशन डिझायनर इशा मंत्री हिचा मृत्यू झालाय.
कलंगुट पोलिसांना सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केलीय. पण इशाचा मृत्यू अंमली पदार्धांच्या अति सेवनानं झाला असल्याचा संशय आहे. पार्टी संपल्यानंतर इशाला त्रास होऊ लागल्यानं कलंगुटमधल्या माथु ब्रागांझा हॉस्पिटल दाखल करण्यात आलं. पण तिनं उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
इशा बॉलिवूडमधील नवोदित फॅशन डिझायनर होती. गोव्यामधील कलंगुट परिसरात नववर्षासाठी होणाऱ्या कॉन्सर्टसाठी इशा आली होती. इशानं २०१४मध्ये आलेल्या 'मेरी कोम' चित्रपटासाठी काम केलं होतं. या कामासाठी इशाचं कौतुकही झालं होतं. 'मेरी कोम'मध्ये प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका होती.
गोव्यामध्ये पर्यटकांना अमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध असतात. या मुद्द्याकडे लक्ष वेधत काँग्रेसनं गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.