दीपिका आणि कंगनामध्ये 'कॅट फाईट'

'तनु वेड्स मनु रिर्टन्स'च्या सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, यात बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोणलाही बोलवण्यात आलं होतं, पण या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस कंगना राणावतला ये सहन झालं नसावं, म्हणून दीपिका आल्यानंतर कंगणा पार्टी सोडून निघून गेल्याची चर्चा आहे.

Updated: May 31, 2015, 07:43 PM IST
दीपिका आणि कंगनामध्ये 'कॅट फाईट' title=

मुंबई : 'तनु वेड्स मनु रिर्टन्स'च्या सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, यात बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोणलाही बोलवण्यात आलं होतं, पण या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस कंगना राणावतला ये सहन झालं नसावं, म्हणून दीपिका आल्यानंतर कंगणा पार्टी सोडून निघून गेल्याची चर्चा आहे.

याआधी दीपिका कंगनाचा चित्रपट 'तनु वेड्स मनु रिर्टन्स'च्या स्क्रीनिंगमध्ये सामिल होऊ शकली नव्हती, तेव्हा कंगनाने 'पीकू'ची स्क्रीनिंग आणि सक्सेस पार्टीत सहभाग नोंदवला होता. दीपिका 'तनु वेड्स मनु रिर्टन्स'च्या स्क्रिनिंग पार्टीला न आल्याने कंगना दीपिकावर नाराज होती.

'तनु वेड्स मनु रिर्टन्स'ची प्रोड्युसर कृषिका लुलाने चित्रपटाची सक्सेस पार्टी ठेवली होती, कृषिका ही दीपिकाचा आगामी सिनेमा 'बाजीराव मस्तानी'चीही प्रोड्यूसर आहे. या पार्टीत दीपिका दिसली, मात्र दीपिका आल्यानंतर कंगना राणावत निघून गेली.

या दोन अॅक्ट्रेसमध्ये कॅट फाईट तेव्हा सुरू झाली, जेव्हा मागील वर्षी एक बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड  दीपिकाने कंगनाला डेडिकेट केलं. पण कंगनाचं यावर म्हणणं होतं, जेव्हा माझा परफॉर्मन्स दीपिकाला आवडला, तर तिने पर्सनल कॉल करायला हवा होता, यानंतर दीपिकाने कॉल केला होता, शीत युद्ध थांबलं होतं. पण पुन्हा स्क्रिनिंग आणि सक्सेस पार्टीवरून कॅट फाईट सुरू झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.